एका कॉलेज कुमारीशी,
काल माझी टक्कर झाली..
टक्कर इतकी भयानक होती की,
जखम माझ्या हृदयाला झाली..!!
तिच्याशी टक्कर झाल्यावर,
मी सॉरी म्हणुन खाली पाहिलं..
तिच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर मात्र,
मी स्वतःला स्वर्गात पाहिलं..!!
नाजुक तिचं शरीर,
सुंदर तिची काया..
तिला पाहताच कोणीही म्हणेल,
परीस्थानची आहे ही माया..!!
डोळ्यात तिच्या प्रेम,
गालावरी नाजुक खळी होती..
ओठ जणु गुलाबाचं पान,
तर मनाने खुप हळवी होती..!!
काळ्याभोर कुरळ्या केसांत,
गुलाबाचं एक फुल होतं..
गोऱ्या हातावर सुंदर मेहंदी,
सोबत चमकीलं नेलपॉलिश होतं..!!
टपोऱ्या डोळ्यासमोर तिच्या,
केसांची सुदर लस होती..
हवेची झुळक येताच,
वाऱ्याशी खेळत होती..!!
कपाळावरील नाजुक टिकली,
मनास माझ्या भिडते..
पायातील पैंजण तिच्या,
मधुर सप्तसुर छेडते..!!
हरिणी सारखी चाल तिची,
उंटा सारखे पाय..
कोकिळे सारखा आवाज तिचा,
अविस्मरणीय असा ठाय..!!
तिच्या प्रत्येक शब्दात,
एक गोडवाच होता..
तिचा स्पर्श जणु,
चांदण्याचा वर्षाव होता..!!
त्या दिवशी दिवसभर,
क्लास वेगळाच भासत होता..
कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीमध्ये,
मला तिचाच चेहरा दिसत होता..!!
दिवसभर कॉलेजमध्ये मी,
वेड्यासारखा वागत होतो..
माझ्या प्रत्येक मैत्रिणीला,
तिची माहीती मागत होतो..!!
मी असा का वागतोय,
मला तर काहीच कळत नव्हतं..
पण कॉलेजमध्ये तिच्याशिवाय,
मन कुठंच वळत नव्हतं..!!
आता तिच्याशी ते बोलायला,
मला थोडा वेळच लागेल..
पण तिच्याशी बोलल्यावर,
तिला माझंच वेड लागेल..!!
कवितेवरुन तुम्हाला वाटले असेल,
कि मी एक शब्दवेडा आहे..
अरे पण तुम्हाला काय माहीत,
मी तर तिचाच प्रेमवेडा आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
हा ...हा ....हा.... :D :D :D
:D :D :D
Bhetli ka ti tula....
हो... भेटली ना