*** देवा... *** 8)(http://[move][/move%5D)
देवा...
तुला भेटू तरी कसे
मज काहीच कलेना
जन्म वाहतो उगाचच
मज मार्गच मिलेना
जरी रंगतो जगाच्या
कधी सुख सोहल्यात
प्रयत्ना अंती परमेश्वर
हेचि रचिले जनात
ग्रंथ वाचले अपार
कर्म घड्लेच नाही
तेल ओतले अपार
ज्योत पेटलीच नाही
यत्न सारेच खुंटले
मार्ग भेटला अंधारी
आलो वलून अंतरी
पुन्हा तुझ्याच मी दारी
देवा...
न जगण्याची भीती
न मरणाची भीती
काय कलावे ते फक्त
मोल जीवनाचे हाती
***नवकवी*** ( मनिष सासे )
(8554907176)