किंमत
मौज मजेत दिवस गेले सारे
गप्पाटप्पांमध्ये कशी रात्र सरली
जीवनवाटेवर या धकाधकीच्या
आपली मैत्री जगावेगळीच ठरली
जाता जाता कोणी लावतो ते गाणं
"याद आयेंगे वो कॉलेज के दिन"
खरच मनापासून सलाम तूला
मी पण तुला नेहमी याद करीन
आठवण नक्कीच येणार सगळ्यांना
अश्रुही नयनांतून नकळत झरतील
तडजोड होईल थोडीफार मग
सर्वजण पुन्हा भेटीस येतील
चुकून कळतात काही वेगळ्या गोष्टी
बदल तो सापेक्ष घडत राही
एक गोष्ट चांगलीच कळली
हासू च आसू व्हायला वेळ लागत नाही
म्हणाला मला तो सवंगडीच
नको रे तू जास्त मनावर घेऊ
आता मी तरी काय करू सांग
ज्याच्या डोळ्यांत पाहिल ते कुठे ठेऊ
ना नाराज होतो मी कुणावर
मागेल त्याला माझी सोबत होती
पण कस सांगू तुला त्यावेळी
आपली किंमत कमी झाली होती
कारण काही जास्त मोठं नव्हतं
पण शब्द मात्र ते खुप टोचले
जवळच्याच याराचे शब्द ते
साहजिकच मन बहूत खचले
डाग नाही रे हा मैत्रीवरचा
मैत्री आहे आपली शुभ्र दूध
अन माझी यारी म्हणजे साय....
जाता जाता तू एवढच सांग
आपली गेलेली किंमत परत येईल काय?????.......
कवी :- अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com