चूक होते एकदा
त्रास होतो अनेकदा
चुकणाऱ्याला फुटतो पाझर
न कळत होतो चूकांचा वापर
नसता तूझी या क्षणी सोबत
क्षमा मागतो तुला विनवत
होउद्यात नाती पुन्हा निर्मळ
गतमैत्रीसारखी सोज्ज्वळ
तूज येत नसेल माझी आठवण
आजुनही तू एक सभ्य साठवण
य़ा साठवणीतले कितीक गोडवे
तूझ्या अन्तरिक मला ओढवे
ऊखडुन टाक सर्व दडपने
क्रंदनतून विनवतो हा
सच्चा भूषण ! ! !
;---------------------------
भूषण वर्धेकर
ऑक्टोबर २००६
कसबा पेठ , पुणे