शांघाई-शांघाई
या घर आपलच असा ...
होय...होय....मी..मी...बोलतेय.
तीच...तुमची मुंबई,
चारी कवाड उघडून बसलेय,
सर्वांचे स्वागत करण्यासाठी,
कुणीही यावे, स्वार व्हावे, नसे कुणाला वेळ,
किती सोसू अन का सोसू, मुकपणे हा अत्याचार,
कळणार कधी माझी व्यथा....(२)
इंच-इंच जागेसाठी, ओरबाडून काढलंय मला,
मोठ्या-मोठ्या टॉवर्समध्ये वसाविल्यात झोपड्या,
अजूनही दबा धरून बसलाय ऑक्टोपस,
धरती गिळली, नद्यांचे झाले नाले, तलाव दिसू लागली डबकी,
अगस्ती होऊनी गिळू पाहतोय सागराला,
आता शर्यत सुरु जाहली, भिडण्याची गगनाला,
राजा खर सांग, तुझी पण साथ आहे न या सर्वाला,
भूखंडाच्या श्रीखंडावर ताव मारुनी सुस्त झालाय,
राजकारणी अजगर,
फुकाच्या वल्गना करतात, शांघाई-शांघाई,
नाही व्हायचय मला शांघाई,
द्या मला माझ मूळ स्वरूप, मग बघुया आपण,
कोण दिसतंय सुंदर,
मी की शांघाई?
शिरीष/१९.०५.२०१३.