माझ्या मराठीची बोलु.....
माझ्या मराठी मातीत,
कुठे पिके ऊस कुठे भात.
कड्या कपारीतुन दुमदुमतो,
शिवबाचा वरद हात.
हिच्या रुपाची गोडवी.
गायिली तुका-द्न्यानबांनी,
इथे जन्मल्या साविञी.
पेटविण्या शिक्षणाची ज्योत,
वात तेवत-तेवत,
पसरली हो जगात
फुले-शाहू-आंबेडकर होते ञिकूट अलग,
न्याय देण्या बहुजना,
मार्गी लाविला हा जन्म,
इथे लाविल्या रोपाची
फांदी गेलीया आकाशी
फुलापरी तिचा गंध,
वाटे हवा-हवासा तिचा सुगंध..