Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Sachin01 More on May 23, 2015, 01:42:52 PM

Title: बाबा फक्त तुमच्यामुळेच
Post by: Sachin01 More on May 23, 2015, 01:42:52 PM
बाबा फक्त तुमच्यामुळेच
घेतो आम्ही आनंदाने घास
जगण्यासाठी लागणारा श्वास ही,
बाबा फक्त तुमच्यामुळेच.
पददलितांनाही आली आता जाण,
शासनच नाही तर समाजही देतेय मान बाबा फक्त तुमच्यामुळेच,
काही नाही म्हटल तरी,
माझ्या लेखनीचा हा हात रुळवला,
तुमच्याबद्दल थोडस लिहायला
माणसात बसुन शिकायला मिळाल,
बाबा फक्त तुमच्यामुळेच
या भावनेतुनही
जागवत आहे एक विपरीत बळं,
सांगतो बाबा असच गाजत राहील हे निळ वादळ.!
बाबा फक्त तुमच्यामुळेच...
Title: Re: बाबा फक्त तुमच्यामुळेच
Post by: mayur47 on June 14, 2015, 12:45:04 AM
chan ahe kavita