Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: amipat on May 31, 2015, 08:48:58 AM

Title: फक्त तू नाही आहेस
Post by: amipat on May 31, 2015, 08:48:58 AM

रोज सकाळी उठल्यावर
आरसा बघितला कि जाणवत
जे तुझ्या डोळ्यात  दिसतं ते आरशात दिसत नाही
आणि मग जाणवत कि  फक्त तू नाही आहेस
 


नंतर  अंघोळ करताना दिसतात
शरीरावर तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
एक एक खूण म्हणजे तू लिहिलेली एक कविताच
मग पुन्हा पुन्हा कवितांची  आवर्तनं
आणि मग जाणवत कि  फक्त तू नाही आहेस


एकटा असताना तुझा गंध जाणवतो
खूप जवळ उभी  आहेस वाटून जात
पण एक  जीवघेणी  शांतता असते  सगळीकडे
तुझा  मोहक  आवाज   कुठेच  नसतो
आणि मग जाणवत कि  फक्त तू नाही आहेस




रात्री आकाशाकडे एकटक बघण होतं
चंद्र रोजच्यासारखाच असतो
पण  चांदण्यात तू नसतेस 
तेव्हा  तुझी एक एक आठवण
माझ्या डोळ्यातून ओघळत असते
आणि मग जाणवत कि  फक्त तू नाही आहेस
फक्त तू नाही आहेस