रक्ताच्या नात्यात नसेल
एवढी मैत्रीच्या नात्यात
ओढ असते
कशीही असली तरी शेवटी
मैत्री गोड असते.
मैत्री म्हणजे त्याग आहे
मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर
मैत्री खरा श्वास आहे
मैत्रीच्या या नात्या
बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे
मैत्रिला कधी गंध नसतो
मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी
त्यात खरा आनंद असतो