शिकुन सवरून बाय माझी
करती कसले व्रत
सात जन्मी म्हणे मिळावी
ह्याच नवर्याची प्रत
हुंडा साठी करी मारहाण
रोजच् होई छळ
तरी मागी देवाकडं
नवर्या साठी बळ
नवरा बेवड़ा पिऊन रोज
घरात मारी माशा
पर स्त्री चा नाद करी
भलता हा तमाशा
रोज रोज बाय माझी
घाली त्याला शिव्या
तरी मग का म्हणे
हाच नवरा द्यावा
बाई नेच का करावा
सारा हा उठाठेव
नवरया चे कधीच
सांगा ऐकत नाही का देव
सनी पगारे
9769366302