पाहुणे येती घरा
पाहुणे येती घरा
कधी मी आवरू
कधी मला सावरू
दर्पणी बघुमी कधी
वेणी फणी करू
मी दुबळी कशी
कधी मला शुन्गारू
परत थाप दरवाजावर्ती
पाहुणे येती घरा
डोल्यामाधुनी आसवे येती जरा
बघ परत माघारी कधी जाई
उघडते दार आता गड़े
जशी असे तशी बरे गड़े
आवडले म्हणुनी सांगे आहे देखणी
पटकन दिली संसाराची हातात लेखनी
पाहुणे येती घरा .
सौ. संजीवनी संजय भाटकर :)