*** कार्यकर्ता ***
पळ पळ पळालो
अन मर मर मेलो
साहेबांच्या निवडणुकीसाठी
मी जेलात पण गेलो
ना रात दिस पाहिले
ना उन पाऊस पाहिले
साहेबांच्या निवडणुकीसाठी
माझ रक्त मी वाहिले
लक्ष्य राहिले ना घरावर
वेळ उपासमाराची पोरावर
साहेबांच्या निवडणुकीसाठी
मी विरोधकांच्या टार्गेटवर
वेळ आली निवडणुकीची
मनोमिलन इतर पक्षांची
साहेबांच्या निवडणुकीसाठी
पाय धरले मी विरोधकांची
बहुमताने साहेब आले निवडुन
वाटलं आयुष्य जातील घडवुन
पण कार्यकर्त्याची किंमत कळते
जेव्हा निवडणुक जाते संपुन
(रविंद्र कांबळे पुणे 9970291212)