Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on June 29, 2015, 06:48:28 AM

Title: तडका - स्री जन्मा,..
Post by: vishal maske on June 29, 2015, 06:48:28 AM
स्री जन्मा,...

स्री जन्माचा हेवा होतो
समाजातुन पुन्हा-पुन्हा
जगण्याआधीच मरण्याचा
सांगा तीचा काय गुन्हा,.?

वारंवार पाहिला आहे
स्री-पुरूषांतील दुजेपणा
अन् स्रीयांनीही केला आहे
कधी स्रीयांचाच खुजेपणा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३