।। कधितरी !!
तुझी आसवे ठेवली आहेत जपुन मी
होतील मोती त्यांचे कधीतरी !!
होती साक्षीलाही फुले मोग-याची
बोलतील आणा-भाका कधीतरी !!
होता शिंपडला सडा कुंकवाचा भांगेत मी
ऊलगडेल सौभाग्य माझे कधीतरी !!
केश काळे कुरळे जणू वाटा नागमोडी
येशील या वाटेवरून माघारी कधीतरी !!
सरली रात्र केंव्हा मज कळलेच नाही
होईल पहाट पुन्हा आपल्या प्रितीची कधीतरी !!
श्री.प्रकाश साळवी
30/06/2015