येरे येरे पावसा
येरे येरे पावसा
व्हाईटचा देतो पैसा।
पैसा होईल खरा
बरस आता तू जरा।
तु पण ये गं सरी
पहातोय वाट दारी।
लवकर ये तू धावुनी
अंगण जावुदे भिजुनी।
लपंडाव झाला पुरा
घेवुन ये थोडा वारा।
ढकलेल वारा ढगाला
पाणी मिळेल शेताला।
फुलेल शेत जोमाने
शेतकरी जगेल सुखाने।
© शिवाजी सांगळे