निघाली पालखी अन
हात पावसाचे लाभले;
जाशील तू जिकडे
तेवढेच रान भिजले;
आशेवर जगताना
निराशा पदरी आली;
देवाचसाठी निर्मिती
पावसाची या झाली;
तुझ्याच रे पालखीत
दुःख माझे घेवुन जा;
आलाच आहेस तर
न्याय थोड़े देवून जा;
गेलास तर,विचार
विट्ठलास याचा जाब;
का सतावतो म्हणोनी
दे बाबा त्याला दाब;
आदित्य अ. जाधव,(नागुरकर)
०९४०४४००००४,
दि,०९-०७-२०१५;पुणे;
वेळ-१०:२६ मि,रात्री;