Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on July 14, 2015, 09:42:32 PM

Title: तडका - जबाबदारांनो
Post by: vishal maske on July 14, 2015, 09:42:32 PM
जबाबदारांनो

ज्यांची आपुलकी वाटायला हवी
त्यांचाही तिरस्कार वाटू लागेल
जेव्हा कोणी जबाबदार नागरिक
अमाणूषतेनं लोकांना पिटू लागेल

कायद्याने अधिकार असले तरी
अधिकाराने कायदा वागवु नये
अन् जबाबदार्‍या पार पाडताना
आपली संयमी काया धगवु नये

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३