मन हरवलेलं
कौतुक पावसाचे, गुज आतल्या मनाचे।
भिर भिरणा-या, आठवण थेंब दवाचे।।
पुलकीत सुगंधी, खुळ वेड्या भ्रमराचे।
क्षणात वा-यावर, डोलणा-या फुलाचे।।
सुरबध्द विहरणे, खळाळणा-या जळाचे।
पागोळीतल्या त्या, टपटप लोलक थेंबाचे।।
किरणांनी लपणा-या, हळुच मग शिंपायचे।
डोळ्यातून निसटलेले, ओघळ रंग धनुचे।।
दूरवर अडोशाला, अंधुक भास कशाचे?
हरवलेल्या मनातील, धुसर गत स्मृतींचे।।
© शिवाजी सांगळे