नियतीने आज माझी,
अशी का गं जिरवली..
मला लिहायचं म्हंटलं तर,
शब्दांनी पाठ फिरवली..!!
तु दुर झालीस तसे,
माझे शब्द ही दुरावले..
खुप शोधाशोध केली,
पण कुठच्याकुठे हरवले..!!
बोल ना गं आतातरी,
का गं सखे असं केलंस..
तु दुर निघून जाताना,
शब्दांना माझ्या नेलंस..!!
शब्द माझे वेडावलेले,
तुझ्याच मागे फिरणारे..
तुझ्याच मनी राहण्या,
पुनःश्च जन्म घेणारे..!!
माझ्या लेखणीतले शब्द,
फक्त तुझ्याचसाठी असतात..
तु त्यांना समोर दिसली,
की कविता होऊन बसतात..!!
तु आहेस माझ्या सोबत,
तरच लेखणीत शब्द आहे..
नाहीतर आयुष्यातुन माझ्या,
कविताही मग लुप्त आहे..!!
आज सखे तु जवळ नाहीस,
तर नियतीने माझी जिरवली...
तुझ्याचसाठी लिहायचं म्हंटलं,
तरी शब्दांनी पाठ फिरवली...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
(धनराज होवाळ)
मो. 9970679949