प्रिय भारताला ....
प्रिय भारताला संकटकाळा
लावूनी जिव्हाळा जीवापाड सांभाळा ।। धृ ।।
दिन आणि धानिकांनो
शेतकरी सैनिकांनो
नरनारी बालकांनो
राष्ट्रसुत्र चालकांनो
रक्षावया देश आपुला
धावा वेळो वेळी ।। १ ।।
सोने, चांदी, हिरे, मोती
पाचू, मानके मिळती
फळे, फुले, धान्य किती
सारी आपुली संपत्ती
समृद्ध देश आपुला
उरी कवटाळा ।। २ ।।
विशाल वैभवी देशा
लडीवाळे कुरवाळा
आठवूनी उपकार
प्राण सारा ओवाळा
मुरार देश आपुला
काळजाचा गोळा ।। ३ ।।
मुरलीधर शिरसाठ
अयोध्या नागरी, पूजा बिल्डिंग रूम न.२
इगतपुरी जिल्हा : नाशिक
९२७०१२७७६७