स्टेशन
चमचमत्या लाल दिव्यांनी तर
स्टेशनचा सारा नुरच पालटला!!
मिनिटा गणिक येणारे प्रवासी न्
गस्तीवर पोलिस दादा निघाला,
अनाैंसमेंटच्या दृत तालावर
उंदीर खेळ रूळांतमधे रंगला!
मोबाईल कधीचा स्मार्ट झाला
माणुस मात्र अडाणीच राहीला,
हेडफोन घालुन स्व कानांंमधे
पाय बाकडयावर ठेवुन बसला!
मळकट वस्त्रे, मुखी याचना
भणाणलेलं डोकं दुर्गंध आला,
पेंगुळलेल्या देहा समोर पुन्हा
भिकारी हात पसरता झाला!
तेव्हा मात्र चेह-यांवर त्याच्या
ओलेत्या रात्रीत घाम फुटला,
जाव आगे बढो, म्हणताना
आपोआप नाकावर हात नेला!
परिपाठ कर्मचा-यां हा रोजचा
त्याच गाड्या नवा बोलबाला,
वाहते कसला भार स्थिरवास्तु
पहा विचारून कुणा हमाला!
© शिवाजी सांगळे