फुलोरा
आसुसलेे निल आभाळ
भेटण्या आतुर धरणीला,
धुंद सुगंधीत प्राजक्त
आकृष्टतो आभाळाला!
मोहक रूप, ना गंध
आकर्षण गुलमोहराला,
प्रेमाळलेला बवरा तो
दाहक ग्रीष्म पाघळला!
रातराणी फुलवुन देती
सुगंध दरवळ वा-याला,
बहर तसाची येतसे
गुंफुन शब्द काव्याला!
© शिवाजी सांगळे