येऊ नको गड्या,इथे लई खेळ झाला.
पैसा अन् फुशारकी पायी माणूस बेईमान झाला.
गरिबाचा जन्म पोट भरता भरता,
अन्याय सहन करण्यातच गेला.
खोट्या बढायापायी माणुसकीचा जाळ झाला
तुझ्या आवडीचा अन् तुझा येथे मेळ नाही बसणार,
येशील तु गड्या व्हईल तुझी आई फक्त खुष.
बाप करील ऐश केव्हातरी आईलाही वाटेल तुझ- ओझ.
ठरवुन ति कधी टाकीलही कचराकुंडीत बोझ..
म्हणुन सांगतो गड्या तुला येऊ नको तु,
वाढविल त्यांनी तरी प्रेम नाही मिळायची,
दिवसेंदिवस तुला अपेक्षातच खेळायचय
मारुन तुझी इच्छा तुला बाजारात उतरवतील,
भाव येण्यासाठी तुला चांगली लेबल्स लावतील,
राहिलास मागे तर कोण समजुन नाही घेणार,
पण तुला सांगतो जाताना तु येथुन काय नेणार....