Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: vishal maske on September 13, 2015, 07:35:20 PM

Title: तडका - जगी जगताना
Post by: vishal maske on September 13, 2015, 07:35:20 PM
जगी जगताना

जे काही पाहिलं जातं
त्यामध्ये मन वाहिलं जातं
पण न पाहिल्या गोष्टींचंही
कधी गुणगान गायलं जातं

आतुन वेगळं असतानाही
वरून वेगळं दिसलं जातं
दिसतं तसं नसतं म्हणूनंच
इथे जगही फसलं जातं,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३