माझ्याच गीताचे शब्द मी विसरलो आहे
दुस-यांना प्रकाश देत स्वतः विरघळलो आहे ।।धृ।।
तुच राणी, माझ्या जीवनी ।
तुझ्याविना जगणे खोटेच भासे।।
कोणी नाही, दिशा दाही ।
माझे ओसाड जीवन कसे ।।
वाट पाहत तुझीच जगास मी विसरलो आहे ।।
दुस-यांना प्रकाश देत स्वतः विरघळलो आहे ।।१।।
तुझ्या वाणीत, धुंद आठवणीत।
सदैव मी गुंतत आलो ।।
सुधरविण्या जगाला, वेड्या मनाला ।
आयुष्य माझे खर्चित आलो ।।
तुझ्याच श्वासात शांत मी दरवळलो आहे ।।
दुस-यांना प्रकाश देत स्वतः विरघळलो आहे ।।२।।
खट्याळ वारा, नभाचा तारा ।
करून देती प्रेमाची आठवण ।।
कविता लिहतो, तुला वाहतो ।
ही माझी शब्दांची साठवण ।।
या शब्दांच्या दुनियेत मी भरकटलो आहे ।।
दुस-यांना प्रकाश देत स्वतः विरघळलो आहे ।।३।।
माझ्याच गीताचे शब्द मी विसरलो आहे ।।
दुस-यांना प्रकाश देत स्वतः विरघळलो आहे ।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ ऑक्टोबर २००२
९८९२५६७२६४