Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: Dineshdada on October 07, 2015, 08:07:46 PM

Title: विचार सरणी वयर्याची
Post by: Dineshdada on October 07, 2015, 08:07:46 PM
वैरी हा नक्की कोण असतो?

तो बाजारात विकत मिळत नाही
तो भाड्याने देखील मिळत नाही

तो सात समुद्राच्या पालिकडून येत
नसतो

तो तुमच्यापैकीच कोणी तरी एक असतो

तो एक मात्र तिरस्काराने निर्माण होत असतो

म्हणून माणुसकी जपा तिरस्कार
करण्याची वेळच नाही येणार

प्रेम माया अपुलकि ठेवा,वैरी होण्याची वेळच नाही येणार
  🙏रचनाकार🙏
🙏🏻दिनेश पलंगे🙏🏻