******पावसाच्या ओळीत ...*****
"तु असाच बरस नुसता ,
बेभान होवूनी या धरतीवरी।
गारठलेल्या जीवांना भिजवूनी,
पुन्हा थैमान होतात ह्या सरी॥
ह्या वार्याच्या झोतात कधी ,
अशी छान डोलतात ही झाडे।
कधीकधी गार मौसमात याच ,
होती मन अमुचे नकळत वेडे ॥
मी इथेच आहे पावसात ,
चिंब चिंब भिजवणार्या सरींत।
पुन्हा तोच गारवा झोंबणारा,
अन् मन माझे गुंते आठवणींत॥
ही ओढ त्या विजेची,
कडाडणारा आवाज देऊन जाई।
एक लख्ख प्रकाश होता तव,
पुन्हा भय मनी मज येई॥
तुडूंब भरलेल्या नदी नाल्यांस ,
बहरलेल्या पानाफुलांस इथे बघताना ।
मी अजूनी रममान मग होतोय,
इथे ह्या ओळी पावसाच्या लिहीताना ॥"
:- सागर बिसेन
9403824566
******पावसाच्या ओळीत ...*****
"तु असाच बरस नुसता ,
बेभान होवूनी या धरतीवरी।
गारठलेल्या जीवांना भिजवूनी,
पुन्हा थैमान होतात ह्या सरी॥
ह्या वार्याच्या झोतात कधी ,
अशी छान डोलतात ही झाडे।
कधीकधी गार मौसमात याच ,
होती मन अमुचे नकळत वेडे ॥
मी इथेच आहे पावसात ,
चिंब चिंब भिजवणार्या सरींत।
पुन्हा तोच गारवा झोंबणारा,
अन् मन माझे गुंते आठवणींत॥
ही ओढ त्या विजेची,
कडाडणारा आवाज देऊन जाई।
एक लख्ख प्रकाश होता तव,
पुन्हा भय मनी मज येई॥
तुडूंब भरलेल्या नदी नाल्यांस ,
बहरलेल्या पानाफुलांस इथे बघताना ।
मी अजूनी रममान मग होतोय,
इथे ह्या ओळी पावसाच्या लिहीताना ॥"
:- सागर बिसेन