ऐकू आली साद एक
संगीतात होती नाहली,
नकळत झाली संध्या
लाल रंगात ती नटली...
अन् क्षणात मग तो केविलवाणा भास मिटला,
जाग येताच उमजले- हात लाडका कधीच सुटला
साद नव्हतीच ती - होता टाहो दुःखी मनीचा,
न होते ते संगीत- होता खणखणाट तेच तुटण्याचा
नाही किरणे संध्येची- होते जाळे अंधाराचे,
लाल- नव्हता रंग तो... होते सांडले रक्त हृदयाचे