ऐक हाक आज माझी
फुटु दे पाझर तुला
राहुनी दगडाच्या मंदिरी तु
खरच कारे दगड झाला
बघ डोळे उघडुनी देवा
माझ्यावर अन्याय किती झाला
तुझ्या भक्तीचा आज मला
कसा रे प्रसाद मिळाला
कधी ना काही मागितले
आज मागतो मी तिला
होकार म्हणुनी एकदाच तु
वाजु दे मंदिराच्या घंट्याला
नाहीतर फोडुन मस्तक माझे
गाभा-यात प्राण लावीन पणाला
निघता श्वास शेवटचा माझा
कोण पुजेल मग तुला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938