--- शोध ---
उराशी स्वप्ने बाळगून,
अजूनही मी जगतो आहे,
गोते खाता या भवसागरात
किनारा मी शोधतो आहे,
**
वाटेत काटे असताना,
मी वाट चालतो आहे,
विराण वाळवंटी मी,
एक फुल शोधतो आहे .
**
मायेचा पसारा पांघरून,
मी दुखः हे झेलतो आहे,
सोसून भोग सारे इथले
सुख मी शोधतो आहे .
**
चंद्रभागेच्या तटी मी,
स्वानंदी नाचतो आहे,
मंदिरी राउळी मी,
देव शोधतो आहे.
**
श्री. प्रकाश साळवी
prakashsalvi1.blogspot.in