खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा ||धृ||
आपल्या दोघांच्या भेटीची
साक्ष देती चांदण्या
जवळ मी असताना सखे
का तुझ्या झुकती पापण्या?
भासे तुझ्या मिठीत
स्वर्ग हा नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||1||
बदलले जीवन माझे
प्रथम तुज पाहता
विसरून सारे जातो
आठवणीत रात्री जागता
ये प्रिये कमी करू
दोघांमधील दूरावा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||2||
दाखवून देऊ जगाला
डाव आपल्या प्रितीचा
दे हात तुझा हाती
आनंद लुटू प्रेम गीताचा
जाऊन सामोरे जगाला
इतिहास रेखू नवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा||3||
खेळ खेळती चांदण्या
साथ देई चांदवा
कोजागिरी च्या रात्री
वाहतो हा गारवा | | धृ | |
यल्लप्पा सटवाजी कोकणे
20 ऑक्टोबर 2015