(http://72.78.249.110/SM3/A298CF1571759B7C8FE771ED712FA903D049245469050995.file)
जाण आहे सारे मला
नाही मी अजाण...
नको अनोळखी स्पर्श मला
नाही मी बाहूली बेजान...
नका करू भंग मला
नाही अनोळखी माझी पहचान...
नका करू दुर मला
नाही मी मुलगी सैतान...
ओळखते मी स्पर्श विचित्र
नका करू माझे शोषण...
नको कुणाचा आधार मला
नाही माझा लंगडा प्राण...
नका समजू हतबल मला
नको भिकेत चरित्राचे दान...
जाण आहे सारे मला
नाही मी अजाण...
नको अनोळखी स्पर्श मला
नाही मी बाहूली बेजान...
- गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com
best poem.
Thank you so much Pramod ji...