!! आत्मचिंतन !!
उगीच मोकाट फिरण्यापेक्षा
घरात शांत बसलेले बरे
लोकांना बेकार दिसण्यापेक्षा
घरात भांडी घासलेले बरे..!!
श्रीमंती आव आणण्यापेक्षा
ओळख खरी दिसलेले बरे
नाव्हीची उधारी ठेवण्यापेक्षा
घरात दाढी तासलेले बरे..!!
गावाचा- गाडा हाकण्यापेक्षा
घरची गाडी पुसलेले बरे
फुकट हमाली करण्यापेक्षा
गावगाड्यात नसलेले बरे..!!
लाचार होऊन जगण्यापेक्षा
कष्टाने आता कसलेले बरे
सुखाची दुःखात घालण्यापेक्षा
प्रेमाने सर्वांशी हसलेले बरे..!!
रवींद्र कांबळे 9970291212