📝🌸सुमनाच्या शोधात 🌸
भ्रमरागत हे जगणे आता,
इकडून तिकडे फिरकत जावे।
शोध सुमनांचा घेता घेता,
जिकडे तिकडे शोधत राहावे।।
प्रवासात या माझ्या हिंडण्याच्या,
वाटेत कुणी तरी भेटावे।
पण मनास या भ्रमराच्या,
कुणीतरी तेच हवे असावे।।
शोधात शोध घेता पुष्कळांच्या,
एक त्याच सुमनास शोधावे।
जगता फक्त तीरावरी आशेच्या,
कधीतरी भेटेल म्हणुनी चालावे।।
जर जगणे हेची भ्रमराचे,
होती वेदना कसे मोजावे।
तरीही स्वप्न हेची मनाचे,
गवसेल कधीतरी हेची वाटावे।।
आली वाटेत वादळे अनेक,
तरीही मन माझे न थांबणार।
आशेवर जगतोय मी प्रत्येक तव,
भेट भ्रमराची सुमानाशी नक्की होणार।।
✒ सागर बिसेन
९४०३८२४५६६