Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Akshay S Mahajan on December 03, 2015, 07:57:56 PM

Title: मुंबई- एक स्वप्न शहर
Post by: Akshay S Mahajan on December 03, 2015, 07:57:56 PM
 मुंबई-एक स्वप्न शहर

अनुभवल एक स्वप्नांच शहर,
जेथे असतो फक्त गर्दीचा कहर.
होतो तिथे अनेक स्वप्नांचा पाठलाग,
ज्याचा असतो मुंबईकर एक अविभाज्य भाग.

नसतोच कुणालाही कुणासाठी वेळ,
असतो फक्त एक परिस्थितिशी खेळ.
नात्यांचा नसतो कुठलाच ताळमेळ,
फक्त ओढ असते लोकलमध्ये आधी कोण चढेल.

सामान्य मुंबईकर करतात अनेक प्रयत्न,
मालकीचा फ्लैट घेण हे देखिल असते स्वप्न
परकीय लोंढे करताय मुंबईचे अतोनात हाल
मुंबई मात्र आपली खेळते वेगळी चाल.

मुंबईने दिलीय अनेक स्वप्नांना मोकळी वाट
लोकलमधे असते मात्र गर्दी भरमसाठ.
अनेक कठीण परिस्थितिंसमोर मुंबईकर, असतो उभा ताठ,
जो जगाला शिकवितो एक नविन पाठ.

               -Akshay S Mahajan
                           मो़नं ८९८३१५९२८३