बालपण
इटुकला पिटुकला मी बाळ
इथे तिथे पळायचो
क्षणात हिरमुसलो तरी
क्षणात खळखळूनि हसायचो
आनंदी निरागस मी होतो
फुलपाखरसंगे रमायचो
बोबडे बोल बोलत
सगळ्यांना होतो मोहवीत
माझे ते लुटूलुटू चालणे
स्वछंदीपणे बागडणे
नाजूक हातांचा विळखा
लावायचो चिंता विसरायला
असे ते बालपण कुठे हरवले
खूप शोधले तरी नाही सापडले
बालपणीचा तो धडा पहिला
तरुणपणी का न येई गिरवाया
कोठे गेलो हरवून
फक्त आठवणीत का माझे बालपण
स्वच्छंदी, निस्वार्थी, निरागस
का तो हर्ष न ये अनुभवास
बालपणीचा आनंद खरा
जीवनाला लावी अर्थ न्यारा
तरुणपणी चिंता मोठी
कशी सोडवावी हि गोठी
आपुल्यामधील बाळ ठेवूया जागा
कठीण समयी तो कमी करील त्रागा
निष्पाप निरागस पण खरा
जीवनाचा तो रंग न्यारा
मोठे होऊया मोठे रे
आनंदाचे बहु साठे रे
ते मिळविण्यासाठी आपण
आपुल्यातील बाळ जगूया रे
सौ सुप्रिया समीर मडये
madyesupriya@gmail.com