Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Balgeet And Badbad Geete => Topic started by: Siddhesh Baji on December 16, 2009, 04:27:26 PM

Title: माझया छकुलीचे डोळे
Post by: Siddhesh Baji on December 16, 2009, 04:27:26 PM

माझया छकुलीचे   डोळे , दुधया कवडीचे डाव
बाई! कमळ कमळ, गोड चिडिच ग नांव!
जरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई, खडीसाखरे चे खडे!
सवर जगाचं कौतुक, हिच्या  झांकलया मुठीत
कु ठे ठे वूं ही साळु नकी, माझया डोळयाचया पिंजर्यात
कसे हांसले ग खुदकु न, माझया बाईचे हे ओठ
नजर होईल कोणाची, लावुं दा ग गालबोट!


-----
वि  . भी  . कोलते