पक्षी
पक्षांमधला पक्षी
बांधतो घरटे झाडापाशी
आकाराने वेगवेगळे
पिल्लांसाठी ते अडले
जीव त्यांचे टांगले
झाडावरती असती झोपले
आहे पक्षी मनोहर कारागीर
नाजूक काट्यांनी करती घर
रंग बिरंगी पक्षी मनोहर
आवाजाची करिती कीर कीर
इवलीशी ती चोच
तेच दात तेच ओठ
दोन हाथ दहा बोटे
देई पिल्लांना आणून दान गोटे
झाडावरती करतो झुला
साद घालतो मंजुळा
सौ . संजीवनी संजय भाटकर