Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: avi4u.iitkgp on January 01, 2016, 06:10:51 PM

Title: 'नो बॉल'
Post by: avi4u.iitkgp on January 01, 2016, 06:10:51 PM
आपण व्यर्थ शृंखलेत बरबाद झालो
खोलीची पर्वा न करता दरीत पडलो
एका चुंबनाने दोघ मोहजालात अडकलो
एक प्रेम ज्याला नाकारू नाही शकलो

आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं ,
मरेपर्यंत हवीये तू मला ....
मृगजळाच्या मागे धावयचा नाही मला ,
मरेपर्यंत हवीये तू मला ....

'नो बॉल' सारखा आलोय तुझ्याकड ,
सडकून मैदानाबाहेर पाठवू नकोस
मला तुझ्या 'क्रीझ' जवळ यायचा होता
पण तू 'extra hit 'ला ही सडकलं

आभाळाच्या ही वरती तुला मी चढवलं
आत्ता तुझे डोळे खाली बघायला हि लाजल
सारच बदलल, तू माझ्या मनाला जाळलं
अन त्याच राखेत जमिनीवर प्रेम अडकलं

आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं ,
आजन्म हवीये तू मला ....
मृगजळाच्या मागे धावयचा नाही मला ,
आजन्म तू हवीये मला ...

'नो बॉल' सारखा आलोय तुझ्याकड ,
सडकून मैदानाबाहेर पाठवू नकोस
मला तुझ्या 'क्रीझ' जवळ यायचा होता
पण तू 'extra hit 'ला ही सडकलं

मला कधीच लढाई सुरु करायची नव्हती
मला तुझ्या सीमेवर यायचं होत
जुलमाने जिंकण्यापेक्षा ,मी हरण स्वीकारलं
रडत -रडत हसण्यापेक्षा , मी ओठांना शिवलं

आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं ,
मरेपर्यंत हवीये तू मला ....
मृगजळाच्या मागे धावयचा नाही मला ,
मरेपर्यंत हवीये तू मला ....

'नो बॉल' सारखा आलोय तुझ्याकड ,
सडकून मैदानाबाहेर पाठवू नकोस
मला तुझ्या 'क्रीझ' जवळ यायचा होता
पण तू 'extra hit 'ला ही सडकलं