Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prernadayi Kavita | Motivational Kavita => Topic started by: Sandesh bharati on January 13, 2016, 12:25:03 AM

Title: नटसम्राट माझा.....
Post by: Sandesh bharati on January 13, 2016, 12:25:03 AM
नाना पाटेकरांचा "नटसम्राट " पाहिला कि प्रत्येकाच मन भरुन येत...तसेच माझंही मन भरुन आल...आणि आयुष्यातल्या खर्या नटसम्राटाबद्द्ल दोन ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलाय......

नटसम्राट माझा.....

आठवत असेल तुला ,
नटसम्राट स्वतःतला.
पण बघ त्यालाही हा प्रश्न पडलेला...
To be Or not to be....?
That is the question....
अनेक भुमिका साकारुन,
प्रेक्षकांची मने जिंकलेला....
हाच नटसम्राट स्वतःच्या ,
आयुष्यात मात्र हरलेला.....
पण आपला नटसम्राट कुणालाच नाही समजलेला....?
स्वतः चे बाबा....
आपल्यासाठी Overtime करुन थकलेला,
तरीही आपल्यासमोर उस्ताही तरूणाची भुमिका साकारलेला......
संकटात खचलेला,
मात्र कुटुंबासाठी नायक ठरलेला.....
वाटते ना,
असा नटसम्राट बाबा,
प्रत्येकाला हवा असलेला......
- संदेश शां.भारती