एक कटीँग चहा!
काँलेज जवळची टपरी, साथीला दोस्त छपरी आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
बंक केलेले लेक्चर्स, टपरीवरती मित्र-मैत्रिणींशी गप्पा-टप्पा आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
हौशी गायक मित्राचे ते गाणे गुणगुणणे, साथीला होतकरू वादक मित्राचे तबला समजून ते टेबल वाजविणे आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
नविन मित्रांची रँगिंग करायला उत्सुक असणारे, तरीपण गरजू मित्राच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे मित्र आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
वर्षभर केलेल्या उनाडक्या, पण परीक्षेच्या आदल्या रात्री जागून केलेला तो अभ्यास आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी आणि सोबत एक कटीँग चहा! जरा आठवतोय का पहा!
रचनाकार - रूपेश वळंजु, कळंबोली-9820981871
mitanchi athvan karun dilit rupeshji..
surekh kavita
Khup chhan Dada 😊😊