Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: omkarjo on December 19, 2009, 12:01:21 PM

Title: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: omkarjo on December 19, 2009, 12:01:21 PM
मी प्रेमामधे तर पडलो नाही?
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची
तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !  ???
Title: Re: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: madhura on December 19, 2009, 07:32:18 PM
very gud  ;)
Title: Re: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: Mayoor on December 19, 2009, 07:34:00 PM
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही ! :D :D :D
Title: Re: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: santoshi.world on December 21, 2009, 01:11:43 PM
 :D chan ahe
Title: Re: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: nirmala. on December 21, 2009, 01:31:00 PM
sundar :)
Title: Re: मी प्रेमामधे तर पडलो नाही?
Post by: rudra on December 22, 2009, 10:45:46 PM
mi tar ajun kadhich nahi padlo
panyasarkha disnara vish asta te