तिच्या नकाराने उध्वस्त झालेल्या आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर पडू पाहणार्या प्रियकराची व्यथा
ही कसली उदासी,
ही कसली खामोशी,
का ही व्यर्थ धडपड,
का ही फुकाची मरमर,
काहीच उमजत नाही मला...
का माझ मन खातं मला,
का ते रुसलं माझ्यावर,
काय दडलंय याच्या मनात,
का त्याचा हा अबोला,
का असं चक्रावून टाकतं मला...?
का ही वेळ फिरली,
गुंतागुंत मनाची वाढली,
गती ऋतूंनी उलटी धरली,
काहीच न उरलं सावरण्यासाठी,
अन् सुर्यास्त झाला प्रातःकाळी,
मळभ निराशेचे कधी हटणार,
नवी पालवी कधी फुटणार,
मुक्त भरारी कधी घडणार,
कधी मन हे ताळ्यावर येणार,
या प्रश्नांची उत्तरे, या जन्मात तरी मिळणार...?
Shri_Mech