चल सजनी चल घरला माझ्या
हवी हवी मज साथ कुणाची
रुसुन बसली तू दूर अशी का
चल बांधुया साथ प्रेमाची
ये अशी समोर तू अनं घे मला बाहुत तू
दूर जाता व्याकुळते मन दे मला आधार तू
का रहावा हा दुरावा फ़क्त आठवासंगी
ये जीवनी प्रिये बांधुनी डोर जन्माची तू
चल सजनी चल घरला माझ्या....
गेले ते दिवस जाता दूर तू न जाऊ शकली
प्रेम माझे प्रेम माझे तू वेडी न जानू शकली
बोललो कधी खोटे तरी ते तुझ्याचसाठी
हसत रहावी तू म्हणून डोर मी ही तोड़ली
चल सजनी चल घरला माझ्या
हवी हवी मज साथ कुणाची
रुसुन बसली तू दूर अशी का
चल बांधुया साथ प्रेमाची
चल सजनी चल घरला माझ्या....
-----------------//**---
गीत
शशिकांत शांडिले, नागपुर✍
भ्र. ९९७५९९५४५०