सरिता किनारी वसले
सुंदर भारत हे माझे ,
हिरव्या हिरव्या रानाचे
वैभव त्यासी साजे
पाहून उंच , डोंगर दऱ्या
विसरी माझे मीच भान
गाऊ किती गोडवे याचे
हिच आहे याची शान
बागडी आनंदात येथे पक्षी
बसी हिरव्या सुंदर वूक्षी
सुंदर माझ्या भारताची
हिच आहे खरी साक्षी
पडे पाउल माळरानी माझे
वाहे पाणी , थंडगार वारे
पाहता विहंगत दृश हे
फिटे माझे पान सारे
पाडी श्रावण सरी येथे
निर्मल पावसाचा सडा
सजे हिरव्यालाल रंगाने
सुंदर रस्त्याच्या कडा
समतेचे राज्य असे जेथे
अशा भारतात माझे गाव
राही आनंदी येथे सर्व
न करे कोणी भेदभाव.
वैभव गो. कुलकर्णी
जालना
मो. ९९२०८९७७०४