चालताना रस्त्याने, अनंत अवधी गेला
हसता हसता रडण्याने, अजून एक दिवस गेला...
जीवनाचे गाणे बेसुर, स्वर कोठे हरवलेला
शोधता पुन्हा नव्याने, अजून एक दिवस गेला...
दु:खाशी लढता लढता, सुख शोधत भरकटलेला
असहाय वेदनांनी, अजून एक दिवस गेला...
पिंजऱ्यातच भावनांच्या, गुरफटून आपसुक झिजला
विव्हळ यातनांनी, अजून एक दिवस गेला...
सुकलेल्या भूमीस पाहता, राष्ट्राचा भार वाहता
आशेच्या तळमळण्याने, अजून एक दिवस गेला...
- जयंत पांचाळ (०९/०३/२०१६)
९८७००२४३२७