कसं ग हे तुला जमतं
तुझ्या पुढे मी घेतो नमतं
कॉलेजला माझ्या
सोबत चल म्हणायचं,
मात्र तिकीट मलाच
काढायला लावायचं.
खरं तर पैसे मी देणार
तिकीट मात्र ती घेणार,
तिने मात्र ऐटीत चालायचं
मी तर ओझेवाला व्हायचं.
कसं ग हे तुला जमतं
तुझ्या पुढे मी घेतो नमतं.
कॉलेजला आम्ही होणार लेट
पण वर्गात ती जाणार थेट,
सोबतीस दोन चार पुस्तकही घेणार
मोकळ्या हाताने मी खाली मान घालुन जाणार.
लिहता लिहता ती
हळुच डोकावुन हसणार
शिक्षेचा मानकरी
मात्र मीच असणारं.
कसं ग हे तुला जमतं
तुझ्या पुढे मी घेतो नमतं.
ऑफ तासाला तिला लागते भुक
कॅन्टीनला नेण्याची मी करतो मोठी चुक,
हे ते खाण्यात तिचा असतो जोर
पैशांचा मला मात्र लागलेला असतो घोर.
खर तर खातानाही ती भरपूर खाणार
ग्लासभर पाण्याने मी वेळ मारून नेणार,
उरलं सुरलं तीच बोलणार
मी फक्त तिचे शब्द झेलनार.
कसं ग हे तुला जमतं
तुझ्या पुढे मी घेतो नमतं.
मग येतो शेवटचा दिवस
तीच म्हणते शेवटी पुरव माझी एक हवस,
उद्या आहे माझा साखर पुडा
येताना घेऊन ये माझ्यासाठी एक सोन्याचा खडा.
त्यावेळी माझा झालेला असतो वडा
डोळ्यातुन वाहत असतो फक्त आसवांचा ओढा,
पुन्हा मात्र तीच समजवुन जाते,
असं नाही रे रडायचं
दुसऱ्या कुणासाठी तु पुन्हा लढायचं.
कसं ग हे तुला जमतं
तुझ्या पुढे मी घेतो नमतं.