चारोळया-बिरोळ्या~18
एक दिवस सुखाचा
एक दिवस दुःखाचा
दोन दिवसाचे आयुष्य
मग प्रवास अनंताचा
या जगात सर्व स्वार्थी
आपले कुणी नाही
एरव्ही सारे गबाळं
कामाचे कुणी नाही
काम पडलं त्याचं की
तुमचे पाय धरतील
काम झाल्यावर मात्र
हात दाखवून जातील
आयुष्याचे चटके
बसतात तेव्हाच कळते
वरुन मात्र सारे
आलबेल भासते
आपले कुणाला म्हणू
ते काही कळत नाही
प्रत्येकाच्या स्वभाव
प्रसंगाशिवाय कळत नाही
ज्याला आपले मानले
ते ही दगा देतात
स्वार्थ साधत असेल तर
लगेच ठेंगा दाखवतात
प्रत्येकाला इथे
न्याय हवा आहे
आपल्या सोईला
वाव हवा आहे
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com