Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: gaurig on December 23, 2009, 09:38:46 AM

Title: कणा
Post by: gaurig on December 23, 2009, 09:38:46 AM
कणा



ओळखलतं का सर मला, पावसात आला कुणी

कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी



क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून



माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली



भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले



कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे



खिशाकडे हात जाताच हसत हसत म्हणाला

पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला



मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा...

- कुसुमाग्रज
Title: Re: ओळखलत का सर मला.........
Post by: rudra on January 19, 2010, 08:14:36 PM
good thinks..............
Title: Re: ओळखलत का सर मला.........
Post by: chetankekade on February 01, 2010, 07:32:35 PM
hee kavita madgulkaranchi aahe
Title: Re: ओळखलत का सर मला.........
Post by: choudharyanilk on February 01, 2010, 09:00:04 PM
Kusumagrajanchi Kavita !
Title: Re: कणा
Post by: MK ADMIN on February 02, 2010, 03:27:51 PM
topic merged.