Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Vatratika => Topic started by: शिवाजी सांगळे on April 19, 2016, 01:04:13 PM

Title: दे धक्का...! सेल्फी ची कुल्फी
Post by: शिवाजी सांगळे on April 19, 2016, 01:04:13 PM
दे धक्का...!

सेल्फी ची कुल्फी

आधी कारखान्याला पाणी
नंतर दुष्काळ कामात सेल्फी,
लागोपाठ ताईंनी वाटली
विरोधकां चघळायला कुल्फी!

सत्ताधार्‍यांची कोंडी म्हणजे
नाही सकारात्मक राजकारण,
दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर तरी
मिळून करावं समाजकारण !

© शिवाजी सांगळे 🎭